Tuesday, 23 October 2012

Import Export Career & Business Opportunities


आयात निर्यात क्षेत्रातील उद्योग आणि रोजगाराच्या संधी:

मागील दोन दशकात जगाने अंतरराष्ट्रीय व्यापारातील (इंटरनैशनल ट्रेड) कार्य प्रणाली, प्रक्रिया वर्तवणूक ह्यात खूप मोठ्या प्रमाणात बदल होताना पहिले आहे.उदारीकरणामुळे  विदेशी बाजारातील   विविध उत्पाद उद्योगाला एक प्रकारचा दृष्टीकोन लाभला ज्यातून अंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळाली. जरी भारतीय वेदिशी व्यापार हा जागतिक बाजार पेठेच्या 1.4% असला तरीपण तीव्रता विभिन्नता लक्षणीय आहे.1991 मध्ये जेव्हा नवीन आर्थिक नीति मांडण्यात आली त्या वेळेस भारतीय निर्यात ही फक्त 18  अब्ज डॉलर एव्हडी होती , जी आज घडीला २४६ अब्ज डॉलर पर्यंत पोहचली आहे. एका आकडेवारीनुसार  सकल घरेलू उत्पादनात 45% वाटा हा आयात निर्याते मूळे  होतो. 2003  साली माल आणि सेवा क्षेत्रातील  जागतिक पातळीवरील भारताचे योगदान हे 0.92% होते जे 2008 मध्ये 1.64% झाले. भारतीय निर्यातेत झालेल्या लक्षणीय वाढीमुळे  2003-2008 ह्याकालावधीत 1.4 करोड रोजगार प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या निर्माण झाले आहेत.  आयात निर्यात नीती अंतर्गत 15% वृधीदार माडण्यात आला आहे, ज्यामुळे भारतीय वेदिशी व्यापार हा जागतिक बाजार पेठेच्या1.4%% हून 1.7% वर पोहचेल. हे धेय्य गाठण्यासाठी भारतीय सरकार सरसावले असून  त्या दिशेने विदेश व्यापार नीति धोरणांमध्ये आवश्यक ती पावले उचलणे चालू केले आहे, ज्या अंतर्गत निर्यात प्रक्रिया क्षेत्र , स्पेशल इकॉनॉमिक झोन उभारून आयात निर्यात क्षेत्राला बळकटी देणे, आयात निर्यात शुल्क माफ करणे असे बरेच उपाय अमलात आणले जात आहेत. ही सगळी समीकरणे बघता भारतामध्ये अंतरराष्ट्रीय व्यापार (आयातनिर्यात) ह्यात रोजगार तसेच उद्योगानसाठी भरपूर संधी  उपलब्ध होणार आहेत ह्यात शंका नाही.

अंतरराष्ट्रीय व्यापारातील विविध पैलू:
व्यापकतेवर जर विचार केला तर, अंतरराष्ट्रीय व्यापार हा आयात निर्यात  करणाऱ्या ट्रैडिंग पार्टनर/ देशांच्या  कार्यप्रणालीचे एकीकरण करून देशाच्या विदेशी व्यापार धोरणांचे लक्ष्य  गाठायला प्रयत्न  करतो.  World Trade Organization (WTO) ह्या संस्थेची 1999 मध्ये स्थापना झाली आणि आणि अंतरराष्ट्रीय व्यापारातील समीकरनांना एक नवीन स्वरूप आणि दिशा मिळाली, ज्या अंतर्गत  अंतरराष्ट्रीय व्यापार कार्यप्रणाली स्टैन्डर्डाइज़ होऊन सर्व सदस्य देशांनी समान कायदे आणि आचारसंहिता पाळण्यास सहमती दर्शवली. जरी ह्यात अनेक अडथळे आणि असहमती असली तरी ह्या संस्थेच्या योगदानाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. विविध ट्रैडिंग पार्टनर/ देश जटिल व्यवहारांमध्ये समविष्ट असल्यामुळे, ह्या संपूर्ण कार्यप्रणालीत क्लिष्टता निर्माण होते.  ह्यासाठी बऱ्याच गोष्टी कारणीभूत असू शकतात, जसे की आयात निर्यात योजना, कायदा, सीमा करार, गुणवत्ता नियंत्रण मुद्दे,  स्थूल/ सूक्ष्म आर्थिक योजना उंचावलेला स्तर, इत्यादी.  अंतरराष्ट्रीय व्यापार कार्य प्रणाली मध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो- उत्पादन,इन्वॉइसिंग,प्याकेजिंग , विमा, दळणवळण, शिपिंग, लौजिस्टिक्स ,निरीक्षण , आर्थिक बाबी, लिखापडी, मार्केटिंग, आयात निर्यात, सीमा क्लिअरन्स, जोखीम मुल्यांकन, विदेशी मुद्रा व्यवस्थापन,मर्चन्डाइज़िंग , कर , रिसर्च आणि डेवलपमेंट इत्यादी. तसेच वरील गोष्टीन व्यतिरिक्त पेशेवर व्यक्तींचा अंतरराष्ट्रीय स्थरावर विविध बहुदेशी कंपन्यांमध्ये  मनुष्य बळ व्यवस्थापनेसाठी होतो.

करियरच्या संधी:
वर विविध पैलूंचा उल्लेख केल्याप्रमाणे, पेशेवर मनुष्य बळाची गरज ही विविध बहुदेशी कंपन्यांमध्ये आयात निर्यात विभाग,निर्यात प्रतिष्ठान(Export Houses) , मर्चन्डाइज़ , सीमा शुल्क विभाग , विशिष्ठ आर्थिक क्षेत्र ( सेझ) , बंदरगाह,लौजिस्टिक्स कंपन्या ,मरीन इंसुरंस कंपन्या, शिपिंग कॉर्परेशन, बँक आणि वित्तीय संस्था ज्या आयात निर्यात करण्यासाठी आर्थिक सहाय्य करतात , विदेशी मुद्रा संस्था, बिपिओ, अंतरराष्ट्रीय लेखांकन कर सल्लागार कंपन्यामध्ये  असते.

.इन्टर्नैशनल ट्रेड मैनेजमेंट  हा करियरसाठी अंतरराष्ट्रीय आणि बहुप्रांतीय कंपन्यांमध्ये भरपूर  संधी उपलब्ध करून देणारा कोर्स आहे. एकदा का ह्यातील पदवीधर कोर्स / सर्टिफिकट कोर्स / डिप्लोमा कोर्स पूर्ण केल्यावर, आयात निर्यात प्रतिष्ठान मध्ये सहज नोकरी भेटू शकते. सूरवातीला नोकरी मध्ये आयात निर्यात, कस्टम कर  संबंधित डाक्यूमेन्ट जिम्मेदारी दिली जाते. ह्यात सुरवातीला निर्यात आणि बंदरगाह ह्यांच्यामधील प्रतिनिधि / दुवा म्हणून काम करावे लागते. सीमा शुल्क व्यवस्थापनासाठी CHA (Custom House Agents) लागतात. तसेच आयात मैनजर प्रबंधक ह्यांची इंसुरंस कंपन्यानमध्ये  मुख्यतवेकारून  मरीन  इंसुरंस कंपन्यांमध्ये मालाला झालेली हानी वित्तीय स्वरुपात मोजण्यासाठी म्हणून नेमणूक केली जाते.  ह्या सर्व अत्यंत  महत्वाच्या आणि तांत्रिक बाबी आत्मसात असणे फार गरजेचे आहे , येथे पेशेवर अनुभवाची तसेच नव्या अंतरराष्ट्रीय कायद्यांची  आणि बदलांचा सखोल अभ्यास असणे आवश्यक आहे.

. मार्केटिंग  क्षेत्रामध्ये सुद्धा  अंतरराष्ट्रीय व्यापारात  MBA  किंवा सर्टिफिकेट कोर्स झालेल्यांना प्रचंड प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. ह्यासाठी संबंधित व्यक्तीला डिग्री सोबत जागतिक बाजारपेठेबद्दल माहिती त्यात असेलेल्या जोखिमेबद्दल चौकस बुद्धी लागते.  ह्या कोर्स च्या जोडीला जर विदेशी भाषेचे ज्ञान अवगत असेल तर तुमच्या नोकरी मिळण्याच्या संधी वाढतील.

3.सल्लाकार संस्था (consultancy) स्थापने ही सुद्धा एक कॅरिअरची उत्तम संधी असू शकते, ज्यामध्ये तुम्ही कन्सल्टन्ट म्हणून अंतरराष्ट्रीय कंपन्यांना उपयुक्त आणि अप टु डेट माहिती पुरवणे, विदेशी गुंतवणुकीच्या संधी, प्रतिस्पर्ध्यानबद्दलची माहिती, तसेच बाहेरील देशांमध्ये कसा व्यवसाय करणे अथवा विकत घेणे ह्या संदर्भ कायदेशीरबाबी आणि प्रणालीबद्दल माहिती पुरवणे ह्या प्रकारची कामे कन्सल्टन्ट म्हणून करू शकतात. व्यवसायाचे विश्लेषण करणे त्यातील जोखीमेचा अंदाज घेणे त्या अनुषंगाने अंतरराष्ट्रीय कंपन्यांना विस्तारीकरण आणि गुंतवणुकीचा सल्ला देणे.
4. जर एखादी व्यक्ती कायदे शास्त्रात , तर्क वितर्क  आणि सौदेबाझी करण्यात पारंगत असेल अशा व्यक्तीला WTO , UNCTAD , IMF , World  Bank  , Trade Blocks आणि Trade Associations  ह्या सारख्या मोठ्या संस्थांमध्ये संधी मिळू शकते.
5. कमोडीटी ट्रेड एक्स्पर्टची गरज आयात निर्यात करणाऱ्या कंपन्यांना प्रकर्षाने जाणवते. कादेशीर बाबीनमध्ये रस असलेल्या वक्तीला पेटेण्ट, विविध भौगोलिक उत्पादन सेवा तसेच सेवा कर, शुल्क सूची (टैरीफ), बहुपक्षीय -द्विपक्षीय ट्रेड करार ह्या संदर्भातील वादांवर काम करावयास मिळते.
6. अंतरराष्ट्रीय फायनान्स मध्ये तज्ञ अर्थ मंडळींची गरज राष्टीय तसेच अंतरराष्ट्रीय  पातळीवर असते. टिचिंग हा  सुद्धा  अंतरराष्ट्रीय व्यापारातील एक सुवर्ण संधी म्हणून बघितला जाणारा करिअर पर्याय आहे. तसेच आयात निर्यात कमोडीटी रिपोर्टिंग म्हणून मीडिया पत्रकारितेत भरपूर प्रमाणात संधी उपलब्ध आहेत,

. विश्लेषणात्मक कौशल्य आणि  अंतरराष्ट्रीय फायनान्स / व्यापार ह्यामधील अनुभव असलेल्या व्यक्तींना बँक आणि वित्तीय संस्था ह्यात संधी असते. आजघडील राष्ट्रीय तसेच अंतरराष्ट्रीय बँकांमध्ये विविध विभाग जसे कि विदेशी मुद्रा विभाग , निर्यात  फायनान्स, जोखीम व्यवस्थापन इत्यादी विभागांमध्ये प्रशिक्षित मानव बळाची गरज प्रकर्षाने जाणवत आहे.

. उद्योजक म्हणून सुद्धा ह्या क्षेत्रात करिअरच्या अनंत संधी उपलब्ध आहेत.  ह्यात सर्वात आकर्षित करणारी संधी म्हणजे निर्यात प्रतिष्ठान (EXPORT HOUSE) स्थापन करून अंतरराष्ट्रीय व्यापार सुविधा पुरवणे, तसेच आयात निर्यात क्षेत्रात अनुभव असलेली मंडळी स्वतःचे कार्यविधि संबन्धी सेवा पुरवणारे कार्यालय उघडू शकते

Course In Aurangabad:
 

Course Name
Eligibility
Organizations      Name
Address   & 
Contact Information
ACPIT:-Advanced Certificate Program In International Trade
Last Year Appeared
Exim Institute- Duration 3 Months Weekend Classes.
Plot. No 8 Anupam Housing Society, Shreynagar, Osmanpura Aurangabad.  Ph.No:8007639503                                          Email- exim.aurangabad@gmail.com

No comments:

Post a Comment